Thursday 23 October 2014

वीटभटटीवरील जीवन.............................

मी दुसर्या वर्षाच्या सोशल वर्क च्या कोर्स मधे असताना, सर्वहारा जन आंदोलन ह्या संघटनेमधे रायगड मधील रोहा व माणगाव ह्या तालुक्यामधे उल्का ताई व् त्यांच्या सहकार्याच्या मदतीने फिल्ड वर्क करीत होते. सुरुवातीच्या काळात आह्मी सगळे विद्यार्थी संघटनेला समजुन घेत होतो. जसजसा दिवस जात होता, आंदोलन, आदिवासीचे हक्क, सरकार मुर्दाबाद अश्या किती प्रकारच्या शब्द जवळचे झाले होते.

एकदा उल्का ताईने आह्मा विद्यार्थाना विटभटटीवर काम दिले होते की विटभटटीकामगाराच्या कामाची, परिवाराची माहिती घ्यायची होती. मी पहिल्यांदा विटभटटीवर पाऊल ठेवले होते, लहानपणी त्याबद्दल कुतुहल होते की ह्या विटा कश्या बनविल्या जातात? अन त्या कश्या रचल्या जातात एकमेकांवर? आणि ती वेळ माझ्यावर आली पाहण्याची.

आह्मी वेगवेगळ्या छोट्या गावातील वाड्यामधे विटभटटी परिवाराला भेट देत असू. भेटीच्या दरम्यान पाहिले की, कर्नाटक मधून जास्तीत जास्त परिवार काम करीत असत. तसेच एकाच गावातील लोक सर्वात जास्त काम करीत जसे शेणवई परिसरातील/वाड्यातील परिवारांचा सहभाग विटभटटीच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर होता. आह्मी रोह्या तालुक्यातील रामराज, भातसई, म्हसळा, कातळपाडा ह्या पाडयातील विटभटटीना भेट दिली होती. कामगारांना अतिशय हलाखीचे काम करावे लागत असत. आणि त्यावेळेस उन्हाळयाचे दिवस होते, मग तर कल्पना करुच शकतो की किती त्रास होतो तो? विटभट्टीतील कामगारांचा दिवसभर संपर्क मातीसंगे होत असतो. जास्तीत जास्त करुन नखे टूटने, हातापायांची चामडे निघणे, बोटांमधे चिखल्या होणे ग्लानी ही येत असावी अश्या किती प्रकारच्या शारीरिक व्याधि होत असतात.

ह्या कामात सगळे वयोगटातील माणस काम करतात अगदी लहानांपासुन (१० वर्षावरील मुले)ते मोठ्यापर्यंत काम करतात म्हणजे पूर्ण कुटुंब ह्या कामामधे सामिल होत असे. त्यामुळे ह्या मुलांच्या शाळा ही बुडत असत. तसे तर सरकारच्या स्कीम नुसार साखर शाळा सारखे प्रकल्प असतात पण ते कुठे दिसेनासे झाले होते. दुसरीकडे मुलांना ह्या कामाची ओढ़ लागल्याने अभ्यासाकडे किती लक्ष असत असेल? तसेच जेव्हा ही मुले आपल्या घरी माघारी जातात तेव्हा ही ते जाण्यास तैयार असतील का? आशा प्रकारचे प्रश्न माझ्या मनात उमटतात. अश्या वेळेस भविष्याबद्दल तर खुपच गंभीरता वाटते.

वीटभटटी कामगार जानेवारी किंवा फ्रेब्रुवारी मधे भटटीवर कामाला येतात. अन माघारी आपल्या गावी मे-जून पर्यत निघून जात असे. तोपर्यंत तर शाळेची परीक्षा ही होउन जाते. त्यामुळे मुलांचे वर्ष तर वायाच जाते. काही परिवाराला विचारल्याप्रमाणे त्यांची मुले शिक्षकांच्या मदतीने परीक्षा देतात. परंतु घरी गेल्यानंतर शाळेत जाण्याची आवडही कमी होते, त्यामुळे मुले पुन्हा शाळेत जातील ह्याविषयी शंका निर्माण आहे.

कामगारांना मजूरी जोड़ीद्वारे मिळते म्हणजे पती-पत्नी मिळून ३०० रुपये. प्रत्येकी वैयक्तिक रुपाने प्रत्येकाला  मजूरी मिळत नाही. प्रत्येकी एक हजार विटावर ही मजूरी मिळते. पाचशे-सहाशे विटावर मजूरी मिळत नाही. मजूरी व्यतिरिक्त मजुरांना दर आठवड्याला खाण्यापिण्यासाठी खर्च भेटतो त्यास “खर्ची” म्हणतात. ही खर्ची मजूर गरजेनुसार घेत असतो, कोणी तीनशे घेतो तर कोणी पाचशे घेतो जर जास्त लागले तर मागुन घेतो. तसेच काही मालक ४० किंवा ९० किलो तांदुळ देतो. वेळ आल्यावर दवाखाण्याचा खर्चही देतो. जेव्हा मजुराचे काम पूर्ण होते तेव्हा, मालक हिशोब करतो तेव्हा जे काही अगोदरची खर्ची मजुरांना दिलेली असते ती मजूरी मधून कापून घेतली जाते.

आदिवासी समाजात गनेशचर्तुथी सण महत्वाचा असतो. त्यामुळे काही मजूर लोक, मालकाकडून अगोदरच त्यांची मजूरी एडवांस घेत असतात यास “उचल” म्हणतात. ही उचल १० हजार ते १५ हजारापर्यंत असते. सण झाल्यानंतर जानेवारी मधे ते मजुरीला निघून जातात. जर परतफेड झाली नाही तर ते पुन्हा येत्या वर्षाला काम करतात.

कामासाठी स्थलांतर करने हा यांच्या जीवनाचा भागाच आहे. वर्षाचे सहा महीने ते शेती करतात. त्यानंतर आर्थिक रित्या कोणत्याही प्रकारची उपलब्धता नसल्याने ते त्यांना बाहेर विटभटटीवर काम करावेच लागते. काही लोक आपला परिवार घेउन येतात तर काही परिवारातील कर्ता-धर्ताच एकटाच कामासाठी येतो. विटभटटी जर घराजवळ असे तर, घरी येउन जाऊन काम करतात अगर नसेल तर ते तेथेच विटभटटीवर झोपड़ी बांधून राहतात. 
  
तर अश्या रीतीने विटभटटी कामगारांचे जीवन असते, नाही फक्त आदिवासी पण इतर सामन्य लोकांचे सुद्धा आयुष्य विटभटटीवरील असते.


No comments:

Post a Comment