Monday 11 November 2013

दिवस आर्यनगरचे....................

आर्यनगरमधे असताना, आमच्या शाळेत नवीनच स्पिकर्स प्रत्येक क्लास मधे लावण्यात आले होते आणि त्यासोबत माइक ही होता. आमच्या सगळया मधे ते कुतुहल होते. कारण प्रत्येक दिवशी आह्मी माइक च्या द्वारे प्राथना करत असू. तर प्रत्येक दिवशी आह्मी क्लास वाइज प्रार्थनेला मुली जात असू. प्राथना कधी मुले घेत नसे का ते माहीत नाही.

माइक मधे बोलताना खुप मजा येत असे. आह्मी गाने गाताना इतके मोठ्याने गात असू की आह्माला माहित नसे की आमचा आवाज किती बेसुरा आहे व आह्मी सुद्धा मजेने गात असू. प्राथनेच्या वेळेस आह्मी कुजबुज करीत असू आणि त्यावेळेस आहमी इतक्या बावळट असू की आह्माला माहीत नसे की माइक समोर बोलू नये.

तर जेव्हा लहानपणी एखादी नविन गोष्ट पाहिली जाते तेव्हा त्या गोष्टीबद्दल असेच नाविन्य असे असते. आणि त्याजवळ आणखी आकर्षित होत असतो.

No comments:

Post a Comment