Friday 4 October 2013

दिवस वटपोर्णिमेचे.........................

आज वटपोर्णिमा, म्हणजे स्त्रीयांचा दिवस ज्यात महिला, उपवास करतात, वडाच्या झाडाची पूजा करता व सात जन्मी हाच नवरा असावा अशी आशा ठेवतात, आज एका बाईशी बोलने झाले ती गेले १० वर्षापासून वटपोर्णिमा साजरा करते, व् तिला हाच पति असावा असे तिला वाटते, कारण नवरा तिच्यासोबत चांगला वागतो.

ज्या स्त्रियाचा पति तिच्या गरजा, मुलांचे संगोपन, परिवाराला बघणे तसेच स्वत:बद्दल ही काहीतरी चागले करण्याचा विचारात असने इत्यादि गोष्टी करीत नाही तर टी स्त्री तर कधीच असे म्हननार नहीं की हां पति सात जन्मी असावा.

माझा पहिला प्रश्न असा की का सात जन्म येणार का, कारण निसर्ग किंवा देवाच्या नियमानुसार उत्पत्ति आणि नाश ही गोष्ट होणारच, पण त्यात काय भरोसा तीच व्यक्ति, पशु-प्राणी पुन्हा एकदा जन्मास येइल? कारण मी अजुन तरी कोना व्यक्तीचा पूर्ण-जन्म पहिला नाही, म्हणून ह्या स्त्रियांची इच्छा पूर्ण होणार की नाही यात शंका आहे,


दूसरा प्रश्न असा येतो की एकाच व्यक्ति सोबत का प्रत्येक स्त्रीला रहायला आवडेल? सगळ्या तर तसेच विचार करत असतील का? का पुरुषांना पण असे वाटत असेल का की हीच पत्नी असावी कारण ते सुद्धा बहुतेक तिला वैतागलेले असावेत?

तीसरा प्रश्न असा की पुरुष का नाही उपवास करीत किंवा वडाची पूजा करीत नाही? बहुतेक समाजाने तो अधिकार दिला नसावा, म्हणून इच्छा असुनही पुरुष करीत नसावे, बहुतेक काही पुरुष उपवास करीत असेल की हीच बायको आपणास लाभावी जन्मो-जन्मी. पण किती विचित्र असेल जर पुरुष वडाच्या झाडाची पूजा करतो, कल्पना केल्यावरही ही किती विचित्र वाटते.

मात्र हा सण मला फार आवडतो, कारण सगळया स्त्रिया सकाळी उठून अगदी छान तैयार होतात, वडाची पूजा करतात, ह्या दिवशी वडाला खरच किती मान असतो त्यास ही बरे वाटत असेल. मी लहान होते तेव्हा आमच्या बाजुच्या घरातील मामी मला काळ्या मन्यांच्या माळा बनविण्यास बोलवित असे कारण पूजा झाल्यानंतर त्या स्त्रीयाना घालण्यास सांगत असे, तर त्या  माळेबद्दल खुप आकर्षण असे, मला असे वाटे की मी पण घालू पण घालू शकत नाही कारण कुवारी आहे, तरिसुध्हा एका महिलेकडून मी मागुन घेतले व हातात ब्रेसेलेट म्हणून हातात घातले, चांगले वाटते.

काही वर्षानंतर हां सन तर दिसानारच नाही कारण सण साजरे करने आजच्या नोकरदार महिलेला जमण कठिन आहे, तरीसुद्धा ज्याना खुपच आवड असेल तर त्या नक्कीच करतील अगदी कामाला दांडी मारून! 


   

No comments:

Post a Comment