Tuesday 3 September 2013

आज शाळे मधे ५ वीच्या मुलांनसोबत खुप छान वेळ गेला. मुलांना इंग्रजी खुप आवडत. त्यामुळे त्यांच्यासोबत इंग्रजीच्या सवांदाची पकड लागावी म्हणून घेत होते. त्यावेळस प्रत्येकी एक – एक जोड़ी बोलवून घेत होते, त्या जोडीमधे एक मुलगा व मुलगी ठेवले होते. त्या दोघांना दोन्ही प्रश्न विचारायचे होते. त्यावेळस त्यांच्यासमोर काही इंग्रजी मधे प्रश्न ठेवले, ते असे;
-         What is your name?
-        What is your mother?
-       What is your father name?
-       What is your brother name?
-        What is your sister name?
मुलांनी ते खुप चांगल्या रितीने केले, त्यामधे त्यांना मजा सुद्धा येत होती. जी मुले प्रश्न विसरत होती किंवा उत्तर द्यायला जमत नव्हते तर बसलेली मुले सुद्धा त्यांना सांगत होती. पण तो सवांद छान झाला.
त्यावेळेस एका सवांदामधे मुलाने मुलीस प्रश्न केला की, तुझ्या आईचे नाव काय? (इंग्रजी मधे). त्यावेळेस ती अगदी स्तब्ध झाली.


No comments:

Post a Comment